शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर; राज्यपालांच्या हस्ते होणार खेळाडूंचा सन्मान

4

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले आहेत. येत्या 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. 2017-18 या वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना 2017-18 यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना घोषित करण्यात आला आहे. अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स, मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबड्डी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो) यांना पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा तावडे यांनी पत्रकार परिषदेत केली.