वेश्येबरोबर सेक्ससाठी सरकारने पैसे द्यावेत महिला खासदाराची मागणी

सामना ऑनलाईन, बर्लिन

अपंग आणि विविध विकारांनी जर्जर व्यक्तींना वेश्येबरोबर सेक्स करण्यासाठी सरकारने पैसे द्यावेत अशी मागणी जर्मनीतील एका महिला खासदाराने केली आहे. ग्रीन पार्टीच्या प्रवक्त्या खासदार एलिझाबेथ स्कॅफनबर्ग यांनी म्हटलंय की अशा व्यक्तींनी संभोगासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत घेतली पाहीजे.

sex

मात्र ही मागणी करत असतानाच या महिला खासदाराने हे देखील म्हटलंय की यासाठी संभोगामुळे वैद्यकीय फायदा होणार असेल आणि त्यासाठी त्या रूग्णाकडे पैसे नसतील तरच त्यांना ही मदत देण्यात यावी. जर्मनीमध्ये वेश्याव्यवसाय हा कायदेशीर आहे. २००२ साली याला मान्यता देण्यात आली होती. ‘वेल्ट एएम सोनटॅग’ नावाच्या एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की याआधी वेश्यांनी नर्सिंग होममध्ये जाऊन रूग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांची सेवा ही रूग्णांसाठी वरदानच  असते असं या नर्सिंग होममधल्या सेक्सबाबत मार्गदर्शन करणाऱ्यांचं म्हणणं आहे.