‘खिलाडी’ अक्षय म्हणतो, अगर बिवी पास चाहिए, तो घर में संडास चाहिए

1

सामना ऑनलाईन, मुंबई

अगर बिवी पास चाहिए, तो घर में संडास चाहिए… अभिनेता अक्षयकुमारने हा दमदार डायलॉग सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. हा डायलॉग केवळ अक्षयच्या ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या आगामी सिनेमातील नसून हगणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी त्याने दिलेला मोलाचा सल्ला आहे.

ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमात आज अक्षयकुमारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हागणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी त्याने काही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. महाराष्ट्र सरकारने जुन्या एसटीडी/ आयएसडी टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे. त्यांचे लोकेशन समजावे यासाठी एक टॉयलेट ऍप तयार करावे. त्यामुळे नागरिकांना त्याची माहिती होईल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करू शकतील.

मुख्यमंत्र्यांनीही या सूचनेचे स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद दिला. यादृष्टीने लवकरच सरकार कार्यवाही करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचवेळी अक्षयने ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या चित्रपटाबद्दल माहिती दिली. तसेच डायलॉग सादर केला. घरात शौचालय असावे म्हणून एका महिलेने घटस्फोट मागितला. त्या महिलेचा दाखला अक्षयकुमारने दिला आणि तिचे कौतुक केले. प्रत्येक पुरुषाला आवाहन केले की लग्न करायचे असेल तर घरी शौचालय असलेच पाहिजे.