जीपीएसचा मेंदूला धोका

2

जीपीएसच्या अतिवापराने मेंदूला धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष लंडनमधील तज्ञांनी काढला आहे. जीपीएसचा सतत वापर केल्याने मेंदूच्या इतर मार्ग शोधण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी राबविलेल्या एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. यासाठी २४ लोकांची निवड करण्यात आली होती. या सर्वांना सेंट्रल लंडनमधील विविध रस्ते, विशेषतः वळणावळणाचे रस्ते शोधण्याचे काम देण्यात आले. हे लोक रस्ते शोधत असताना संशोधकांनी त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवले होते. स्मरणशक्ती आणि नेव्हिगेशनसाठी कार्य करणारी मेंदूतील हिप्पोकॅम्पस कार्यप्रणाली आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेली मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स यांचे विशेष निरीक्षण करण्यात आले. जीपीएसशिवाय रस्ते शोधताना मेंदूतील या दोन्ही प्रणाली योग्य प्रकारे काम करत असल्याचे दिसले. मात्र ज्यावेळी जीपीएसच्या वापराची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मात्र या दोन्ही कार्यप्रणाली आपले काम करत नसल्याचे आढळून आले.