मौजे पावसे पांगरीच्या ग्रामसेविकेने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

77

सामना प्रतिनिधी, जालना

अंबड तालुक्यातील मौजे पावसे पांगरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मनिषा महापुरे यांना 10 हजारांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी तीन महिन्यापूर्वी अंबड तालुक्यातील मौजे पावसे पांगरी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नळ पाईपलाईनचे काम सचिन म्हस्के यांच्या सोसायाटीवर केलेले आहे. सदर काम हे 10 लाख रुपयांचे असून त्यापैकी तक्रारदार यांना 7 लाख 30 हजार रुपयांचे बिल मिळालेले असून उर्वरित बील 90 हजार 700 रुपये बाकी आहे. तक्रारदार यांनी ग्रामसेविका महापुरे यांना भेटून सदर उर्वरित बिलाचे चेक देण्याची विनंती केली असता ग्रामसेविका महापुरे या तक्रारदार यांना म्हणाल्या की, आम्हाला बीडीओ, साहेबांना पैसे द्यावे लागतात तेव्हा तुम्ही मला 10 हजार रुपये दिल्या शिवाय चेक दिला जाणार नाही. तेव्हा तक्रारदार हे ग्रामसेविका महापुरे यांना नाईजास्तव हो, म्हणाले पण मला पूर्ण उर्वरित रकमेचा चेक देऊन टाका तेव्हा ग्रामसेविका यांना तक्रारदार यांना सदर कामाचा 60 हजार रुपयांचा चेक दिला व 30 हजार 700 रुपयांचा चेक दिला नाही.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जालना येथे तक्रार दिली. त्यावरून 3 मे रोजी तक्रारदार हे महापुरे यांना पंचायत समिती अंबड येथे पंचासमक्ष लाचेची मागणीची पडताळणी केली असता ग्रामसेविका महापुरे यांनी तक्रारदार यांच्याकडे कामाचे 60 हजार रुपये बिलाचे चेक दिल्याचा मोबदला व उर्वरित रक्कम बिलाचा चेक देण्यासाी पंचासमक्ष तडतोडअंती 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आज 24 मे रोजी अंबड पोलीस ठाण्यात ग्रामसेविका महापुरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, आ.वि. काशिद, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत, चालक खंदारे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या