महागाई, भ्रष्टाचाराविरोधात शेतकरी कामगार पक्षाचा आज भव्य मोर्चा

सामना ऑनलाईन । मुंबई

महागाई, भ्रष्टाचार आणि शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ मुंबई प्रदेश भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येणार आहे.

उद्या दुपारी 1 वाजता माहीम येथील शेकाप भवनातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शिक्षक आमदार बाळाराम पाटील आणि कार्यालयीन सरचिटणीस ऍड. राजेंद्र कोरडे हे करणार आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, राफेल विमान खरेदीतील सत्य बाहेर काढा, दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या मोदी सरकारच्या योजनेची अंमलबजावणी करा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मनमानी रोखा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता द्या, विनाअनुदानित शाळांचे अनुदान 100 टक्के करा आदी आमच्या मागण्या असल्याची माहिती शेकापचे चिटणीस रघुनाथ महाले यांनी दिली.