ऊन खाण्यासाठी दारात बसल्यानं संतापलेल्या नातवाने केला आजीचा खून


सामना ऑनलाईन। नागपूर

लाईक करा, ट्विट करा

राज्यभरात थंडीचा कडाका वाढलायत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात या थंडीमुळे कुडकुडलेली एक वृद्धमहिला सकाळचं कोवळं उन खाण्यासाठी बसली होती. आजी दारात बसली याचा संताप आल्याने त्या वृद्ध महिलेच्या नातवाने तिचा खून केला.

लीलाबाई शेंडे असं मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. नापूरजवळच्या पिपला गाव इथे राहणाऱ्या लीलाबाई सकाळाचं ऊन खाण्यासाठी दारामध्ये बसल्या होत्या. आपली आजी रोज दारामध्ये बसते हे तिचा नातू नितेशला आवडत नव्हतं. त्यावरून घरामध्ये वादही होत होते. नितेश सकाळी घरातून बाहेर पडत होता तेव्हा त्याची आजी दारामध्ये बसलेली होती. त्याने आजीला रस्त्याच्या कडेला बस म्हणून सांगितलं त्याला लीलाबाई यांनी नकार दिला. यामुळे संतापलेल्या नितेशने घरातली कुऱ्हाड घेतली आणि लीलाबाई यांच्यावर वार करायला सुरूवात केली. लीलाबाई यांच्यावर वार करून नितेश पळून गेला. आईच्या किंकाळ्या ऐकून लीलाबाई यांची मुलगी धावत आली. आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून तिने शेजारच्यांच्या मदतीने लीलाबाई यांनी रूग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी नितेश विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.