आजीचे हातपाय बांधून नातवाने ७० हजार रूपये चोरले

सामना ऑनलाईन, ब्रिजमोहन पाटील

आजीच्या डोक्यात काठीने वार करून तिचे हातपाय दोरीने बांधुन नातवाने ७०हजार रुपये चोरून, नेल्याची घटना गोखलेनगर येथे घडली. याप्रकरणी नातू प्रविण दत्तू डोंगरे (वय २६, रा. वैद्यवाडी, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर) याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रवीणच्या आजी तगलू डोंगरे या घरात पलंगावर बसल्या होत्या. त्यावेळी प्रविण व त्याचे,साथीदार घरात घुसले. प्रविणने आजीला शिवीगाळ करत पैसे मागितले. ते द्यायला नकार दिल्याने प्रवीणच्या साथीदारांनी तगलू यांचे हातपाय बांधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तगलू जोरात ओरडायला लागल्या, यामुळे प्रवीणने त्यांच्या डोक्यात काठीने वार केला आणि नंतर त्यांचे हातपाय बांधून कपाटातील ७० हजार रुपये चोरले. पळून जात असताना त्याने तगलू यांना धमकी दिली की पोलिसांत तक्रार केली तर ठार मारेन

तगलू डोंगरे यापूर्वी गोखलेनगर भागात अवैध दारू विक्रीचा धंदा होत्या.  यातून त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाला होता. प्रवीणच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर तगलू यांनी तिच्या इतर  मुलांसह प्रविणला संपत्तीचे वाटप केले. मात्र तरीही प्रवीणला पैसे हवे होते. त्यामुळेच त्याने हा हल्ला करून पैसे चोरल्याचं पोलिसांनी सांगितलं.