शहर वाहतूक सेवेची बस चोरून तिचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या टोळक्याला अटक

1

विजय जोशी, नांदेड

हैदराबाद येथील शहर बसवाहतूक सेवेतील एक बस चोरुन तिचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या एका टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या टोळक्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली दिली.

तेलंगणा परिवहन महामंडळाची बस (क्र. टीएस 11 झेड 6254) दोन दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याप्रकरणी बुधवारी तेलंगणातील अफजलगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बस चोरीनंतर तेलंगणा पोलिसांचे एक खास पथक बस शोधण्यासाठी नेमण्यात आले. या शोधपथकाला ही बस नांदेड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेलंगणा पालिसांनी स्थानिक पोलिसांना बस चोरीची माहिती दिली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या टीम ने काकांडी परिसरात गुन्हेगारी विश्वातील कुख्यात फारुख आठ्ठाना याच्या फार्म हाऊसवर धाड घातली. त्याठिकाणी बसचा सांगाडाच मिळाला.चोरून आणलेल्या तेलंगणातील बसचे सर्व स्पेयर पार्ट वेगवेगळे करून बसचा केवळ सांगाडाच त्याठिकाणी शिल्लक होता. बस चोरून तिचे स्पेयर पार्ट विक्री करण्याचा चोरट्यांचा हेतू स्पष्ट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फारुख आठ्ठानासह 5 जणांना अटक केली. पाचही आरोपींना तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.