700 कोटींची मालकीण असलेल्या मांजरीचा मृत्यू

8

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

तब्बल 700 कोटींची संपत्ती असलेल्या एका मांजरीचा मृत्यू झाला आहे. ग्रम्पी असे त्या मांजरीचे नाव असून तिचे सोशल मीडियावर करोडो फॅन्स व फॉलोअर्स आहेत. अमेरिकेतील अॅरिजोना येथे राहणाऱ्या या मांजरीची मालिकन तबाथा बुंदसेन यांनी ग्रम्पीच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर सांगितले आहे.

ग्रम्पीचे युट्युबवर 20 लाख सबस्क्राईबर तर फेसबुकवर 85 लाख व इंस्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्स आहेत. 2012 मध्ये या मांजरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या व्हिडीओला दीड कोटीहून अधिक लोकांनी बघितले होते. त्यानंतर या मांजरीची मालकीन तबाथाने या व्हिडीओच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावले होते. तसेच या माजंरीच्या युट्युब चॅनेल, इंस्टाग्राम , फेसबुक, ट्विटर पेजवरूनही तबाथा चांगलीच कमाई करत होती. त्यामुळे तिने तब्बल 700 कोटी रुपये त्या मांजरीच्या नावावर ठेवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या