आरोग्य आणि शिक्षण यांना जीएसटी लागू नाही, तर ‘यांना’ लागणार सर्वाधिक कर

सामना ऑनलाईन । श्रीनगर

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या काउन्सिलची श्रीनगर येथील बैठक संपली असून देशाच्या इतिहासातल्या या सर्वात मोठ्या करसुधार करारात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत ८० ते ९० टक्के वस्तू आणि सेवांवर करांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. बैठकीच्या पहिल्याच दिवशी काउन्सिलने १२११ वस्तूंवर कराचे दर निश्चित केले आहेत. या दरांनुसार सर्व उत्पादनांवर ५, १२, १८ आणि २८ यांनुसार दर निश्चित केले आहेत. या परिषदेत अत्यावश्य सेवा आणि वस्तूंवर कोणतेही कर लावण्यात आलेले नाहीत. तर चहा, कॉफी, साखर आणि खाद्यतेल यांच्यावर ५ टक्के कर लागणार आहे. केसांचे तेल, टूथपेस्ट, साबण इत्यांदी वस्तूंवर १८ टक्के कर निश्चित केला गेला आहे.

वस्तूंखेरीज अनेक सेवांवरही दर लागू करण्यात आले आहेत. आरोग्य आणि शिक्षण या अत्यावश्यक सेवा असल्यामुळे या सेवा कराच्या कक्षेत येणार नाहीत. दूरसंचार आणि वित्तीय सेवांना १८ टक्के कर लागू होईल तर चित्रपटगृहे, रेस आणि कॅसिनोवर २८ टक्के कर आकारणी केली जाईल. विमान प्रवासाच्या बाबतीत प्रवासीवर्गानुसार दर चढता ठेवण्यात आला आहे. इकोनॉमी क्लासवर ५ टक्के तर बिझनेस क्लासवर १२ टक्के असा कर लागू होईल. ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवांसाठी ५ टक्के जीएसटी लागू होईल. तसंच पंचतारांकित हॉटेलांसाठी २८ टक्के, दारुविक्रीचा परवाना असलेल्या हॉटेलांसाठी १८ टक्के तर एक हजार रुपयांपर्यंत भाडं असलेल्या तसंच नॉनएसी हॉटेलांसाठी १२ टक्के इतकी कर आकारणी केली जाणार आहे.

हे आहेत जीएसटीचे दर-

यांच्यावर कर लागू नाहीत-
ताक, दही, मध, फळ, भाज्या, ताजे मांस, मासे, चिकन, अंडी, दूध, पीठ, बेसन, ब्रेड, प्रसाद, मीठ, टिकली, कुंकू, बांगड्या, स्टॅम्प, कायदेशी दस्तावेज, छापील पुस्तके, वर्तमानपत्रे, हँडलूम वस्त्रे इत्यादी

यांच्यावर ५ टक्के कर लागू-
ब्रँडेड पनीर, फ्रोजन भाज्या, फिश फिलेट, कॉफी, चहा, क्रीम, मिल्क पावडर, मसाले, पिझ्झा ब्रेड, साबुदाणे, केरोसिन, कोळसा, औषधे, स्टेंट, लाईफबोटी

यांच्यावर १२ टक्के कर लागू-
सॉस, फ्रुट ज्यूस, भुजिया, फरसाण, आयुर्वेदिक औषधे, फ्रोजन मांस, बटर, सुकामेवा, चरबीयुक्त पदार्थ, टूथ पावडर, अगरबत्ती, चित्रकलेची पुस्तके, छत्र्या, शिलाई यंत्रे, मोबाईल फोन्स

यांच्यावर १८ टक्के कर लागू-
जॅम, सूप, आईसक्रीम, इंस्टंट फूड मिक्स, मिनरल वॉटर, फ्लेवर्ड साखर, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, पेस्ट्रीज आणि केक, टिश्शू, लखोटा, वह्या, स्टील उत्पादने, कॅमेरा, स्पीकर आणि मॉनिटर्स

यांच्यावर २८ टक्के कर लागू-
रंग, डिओड्रंट, शेव्हिंग क्रीम, शाम्पू, हेअर डाय, सनस्क्रीन लोशन, वॉलपेपर, सिरॅमिक टाइल्स, च्युईंगम, कोकोविरहित चॉकलेट्स, पानमसाला, वॉटर हीटर, डिशवॉशर, वॉशिंगमशीन, एटीएम, वेंडिंग मशीन, व्हॅक्युम क्लीनर, ऑटोमोबाईल्स, मोटार सायकल, खासगी विमाने अथवा नौका.