दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील ‘जीएसटी’ घटणार

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

फर्निचर, प्लॅस्टिक उत्पादने, शॅम्पू या वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला जाण्याची शक्यता सरकारी अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. याबाबत येत्या शुक्रवारी १० नोव्हेंबरला होणाऱया जीएसटी परिषदेच्या बैठकीत विचार केला जाणार आहे. ही बैठक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.