संभाजीनगरात गुढीपाडव्याला भव्य शोभा यात्रा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

प्रथेनुसार गुढीपाडवा नवर्षानिमित्त भव्य शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा (१८ मार्च) रविवारी दुपारी ३ वाजता राजाबाजार येथील संस्थान गणपतीचे पूजन करून संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व यावर्षीच्या हिंदू नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शोभायात्रा शहागंज, गांधी पुतळा, सराफा रोड, सिटी चौक, गुलमंडी, संभाजीपेठमार्गे खडकेश्वर येथील महादेव मंदिर मैदानात पोहोचणार असून, सायंकाळी ६ वाजता प.पू. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या अमृतवाणीने व मार्गदर्शनाने श्री खडकेश्वर शिव मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज संप्रदाय, राष्ट्रसंत श्री भय्यू महाराज सूर्योदय परिवार, संत श्री वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मंदिर संरक्षण राष्ट्रीय धर्म संसद, विश्व हिंदू परिषद, आर्य समाज, बजरंग दल, शिवसेना-युवा सेना, जय चतुर्थी प्रतिष्ठान, रेणुकामाता मंदिर ट्रस्ट, वीरशैव लिंगायत व जंगम समाज, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, सनातन संस्था, पतीत पावन संघटना, स्वा. वीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ, ब्राह्मण युवक मंडळ, पुरोहित संघ, सकल मारवाडी समाज, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, श्री योग वेदांत सेवा समिती-संतश्री आसाराम बापू संत सेवा संघ, माहेश्वरी समाज, माहेश्वरी युवा मंच, माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी प्रगती मंडळ, रेड स्वस्तिक सोसायटी, वेदविद्या प्रचार समिती, इस्कॉन, शिवराम प्रतिष्ठान, गुजराती समाज, गुजराती समाज युवा मंच, गुरुद्वारा गुरुगोविंदसिंगपुरा, सिंधी कॉलनी, गुरुद्वारा, धावणी मोहल्ला, मेहगाव, अखिल भारतीय कुमावत समाज, राजपूत संघटना, राजपूत संघर्ष समिती, श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळ, श्रीराम मंदिर ट्रस्ट, जसवंतपुरा, जनसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गवळीपुरा, अखिल भारतीय वारकरी मंडळ, संत निरंकारी संघ, स्वाध्याय परिवार, संतकृपा प्रतिष्ठान, अनिरुद्ध बापू उपासना फाउंडेशन, भगवान महाराज संप्रदाय, सिंधी समाज बहावलपुरी पंचायत, सधांशू महाराज संप्रदाय विश्वजागृती मिशन सत्संग समिती, अध्यक्ष महावीर जयंती उत्सव समिती, अग्रवाल दिगंबर जैन मंदिर सराफा, अग्रवाल दिगंबर जैन मंदिर हडको, श्री श्री रविशंकर (आर्ट ऑफ लिव्हिंग), पतंजली योगपीठ, भजनी मंडळ, ब्रह्मवृंद मित्रमंडळ, मराठा समाज, पेशवा संघटना, शिवसेना महिला आघाडी, दत्तात्रय सत्संग मंडळ पारंपरिक वेशभूषेत विविध संप्रदाय सहभागी होणार आहेत.

धार्मिक, सजीव, निर्जीव देखावे, उंट, घोडे, रथ, विविध बॅण्ड पथक हे मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे. मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेसह हिंदू धर्माच्या या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व हिंदू नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष नंदकुमार घोडेले व समिती सदस्यांतर्फे करण्यात आले