गुजरातचा मुकाबला परदीपशी

सामना ऑनलाईन । चेन्नई

तुफानी चढाईपटू परदीप नरवालच्या झंझावातापुढे काल बंगाल वॉरियर्स संघालाही उपांत्य लढतीत पाटणा पायरेटस्कडून ४७-४४ असा निसटता पराभव पत्करावा लागला. आता उद्या पाचव्या प्रो. कबड्डी हंगामात फायनल गाठणाऱया गुजरात फोर्च्युन जाएंट संघाला आपल्या पहिल्या जेतेपदासाठी पाटणाचा कर्णधार परदीपच्या वादळी चढायांचा पूर्ण ताकदीनिशी सामना करावा लागणार आहे. कारण परदीप म्हणजे पाटणा पायरेटस् असे समीकरणच गेल्या काही प्रो. कबड्डी हंगामात प्रकर्षाने दिसून आलेय. उपांत्य लढतीत बंगाल वॉरियर्सविरुद्ध परदीपने चढायांत २३ गुणांची लयलूट केली. तो वॉरियर्सवर लादलेल्या तीन ऑलआऊटमध्येही सहभागी होता.

प्रो. कबड्डी अंतिम लढत

२८ ऑक्टोबर २०१७, रात्री ८ वाजल्यापासून

जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई