शूटींगदरम्यान विकी कौशल जखमी, चेहऱ्यावर 13 टाके

2

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

बॉलीवुड अभिनेता विकी कौशल जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले आहेत. विकी सध्या गुजरातमध्ये एका चित्रपटाचे शूटींग करत आहे. यादरम्यान, एक अॅक्शन सीन करताना हा अपघात झाला. त्यात विकी जखमी झाला आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवर विकी जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

विकीने 2012 साली प्रदर्शित झालेल्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून करीअरची सुरुवात केली.या चित्रपटात तो सहदिग्दर्शक होता.त्यानंतर लव शव ते चिकन खुराना, या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकला होता. तर 2016 साली राजी, संजू, आणि मनमर्जिया या चित्रपटातून विकीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ यातील भूमिकेने विकीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.