‘गली बॉय’ बनणार आता ‘मेन इन ब्लॅक’

98

सामना ऑनलाईन । मुंबई

बातमीचं शीर्षक वाचून गोंधळात पडला असाल ना? रणवीर सिंग आता थेट हॉलिवूड पदार्पण करणार की काय अशी शंकाही तुम्हाला आली असेल. पण थांबा, ही बातमी थोडी वेगळी आहे. हा गली बॉय रणवीर सिंग नसून सिद्धांत चतुर्वेदी आहे. आपल्या बॉलीवूड पदार्पणानंतर सिद्धांत आता लवकरच हॉलीवूड सिनेमा ‘मेन इन ब्लॅक‘ साठी काम करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित व रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गली बॉय या सिनेमात एम सी शेर या भूमिकेतून सिद्धांतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली.

siddhant-chaturvedi

आपल्या या दणदणीत पदार्पणनांतर लवकरच सिद्धांत हॉलीवूडमधल्या गाजलेल्या ‘मेन इन ब्लॅक’ या चित्रपट मालिकेच्या आगामी भागात दिसणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनमध्ये प्रमुख भूमिका असलेल्या क्रिस हेम्सवर्थसाठी सिद्धांत आपला आवाज देणार आहे. क्रिस हेम्सवर्थ हे त्यांच्या ‘थॉर’ या भूमिकेसाठी जगप्रसिद्ध आहेत. हा सिनेमा हिंदुस्थानात जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

आपल्या या नव्या भूमिकेबद्दल माहिती देताना सिद्धांत म्हणाला, “मी क्रिस यांचा खूप मोठा फॅन आहे, त्यांना भेटणे व त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच आहे.” लवकरच सिद्धात क्रिस यांना भेटून ‘कूल मेन इन ब्लॅक’ बनण्यासाठी काही टिप्स घेणार असल्याचंही त्याने मिश्कीलपणे सांगितलं आहे

आपली प्रतिक्रिया द्या