३६ मुलांचा पिता

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद 

३६ मुले असू शकतात, यावर तुमचा विश्वास बसेल का? तुमचे उत्तर नाही असे असेल तर तुम्ही चुकीचे आहात. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे राहणाऱया गुलजार खान यांना तब्बल ३६ मुले असून आता त्यांना त्यांची तिसरी पत्नी गर्भवती आहे. त्यांच्या घरात ३७वा नवा पाहुणा येणार आहे. खान यांच्या कुटुंबात तीन पत्नी आणि ३६ मुले असून यातील काही मुलांची लग्ने झाली आहेत. त्यामुळे त्यांना नातवंडेही आहेत. सध्या गुलजार यांच्या कुटुंबात १५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. गुलजार यांचा भाऊ मस्तान यांच्यासुद्धा तीन बायका असून त्यांना एकूण २२ मुले आहेत.