भाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती

26

सामना ऑनलाईन। गुरुग्राम

आरएसएसच्या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी गुरुग्राम येथे भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे देखील उपस्थित होते. यावेळी मुखर्जी व खट्टर यांच्या हस्ते गुरुग्राममधील हरचंदपूर आणि नयागाव येथील स्मार्ट ग्राम परियोजनेच्याअंतर्गत अनेक योजनांचे उद्घाटन करण्यात आले.

मुखर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळादरम्यान हरचंदपूर गाव दत्तक घेतले होते. त्यानंतर या गावात अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. या गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. याअंतर्गत ग्राम सचिवालयमध्ये वाय़-फायपासून डिजिटल स्क्रिनही बसवण्यात येणार आहे. दरम्यान, हरयाणात ‘प्रणव मुखर्जी फाउंडेशन”आरएसएसबरोबर एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती. यावर मुखर्जी यांच्या कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात असे काहीच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच मुखर्जी यांनी भाजप व त्याच्याशी संबंधित संघटनेच्या कार्यक्रमात सहभाग घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी जून महिन्यात मुखर्जी यांनी नागपूरमध्ये आरएसएस मुख्यालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती व आपले विचार मांडले होते. आरएसएसच्या कार्यक्रमातील मुखर्जी यांच्या उपस्थितीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांची कन्या शर्मिष्ठा यादेखील मुखर्जी यांच्यावर नाराज झाल्या होत्या. काँग्रेसच्या गोटात यावरून अस्वस्थता निर्माण झाली होती.

summary-/gurugram-pranab-mukherjee-in-bjp-event

 

आपली प्रतिक्रिया द्या