प्रत्येक अग्निशमन केंद्रात होणार अत्याधुनिक जिम!

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई अग्निशमन दलाच्या सर्व ३४ केंद्रांत लवकरच अत्याधुनिक जिम सुरू होणार आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या या व्यायामशाळांमुळे जवानांना तंदुरुस्त होण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांचा फायदा जवान, कर्मचारी-अधिकाऱ्यांना हेणार आहे. यासाठी एक कोटी सहा लाखांचा खर्च येणार आहे.

मुंबईत घडणाऱ्या आपत्कालीन स्थितीमध्ये प्राणांची बाजी लावून अग्निशमन दलाचे जवान आपत्तीग्रस्तांचे जीव वाचवतात. त्यामुळे जवान-अधिकारी तंदुरुस्त असणे आवश्यक असते. काळबादेवी येथे २०१५ मध्ये घडलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेत अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावा लागला होता. या आगीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने अग्निशमन दलाची शारीरिक क्षमता काढकिणे आकश्यक असल्याची शिफारस केली होती. यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळेची गरज असल्याचे अहवालात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने आतापर्यंत सहा केंद्राच्या ठिकाणी क्यायाशाळा सुरू केल्या आहेत. आता उर्करित २८ केंद्रांच्या ठिकाणी क्यायामशाळा सुरू केल्या जाणार आहेत. या कामासाठी तीन कंत्राटदार पात्र ठरले असून त्यांच्याकडून विविध वस्तू पुरवल्या जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तक बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

असा होणार वस्तूंचा पुरवठा

> कंत्राटदार ‘मे. श्री ललिता’कडून कमर्शियल ट्रेड मिल १,४९,४०० रुपये दराने २८ नग, मल्टी स्टेशन जिम १,४०,४०० रुपये दराने २८ नग, बार ५ फूट ऑलिम्पिक ३,९१५ दराने ५६ नग आणि बार ७ फूट ऑलिम्पिक ५,४८१ रुपये दराने ५६ नग यांचा पुरवठा ८९,८६,१९९ रुपयांत (अन्य खर्च धरून) पुरवठा करण्यात येणार आहे.

> मे.आर. एस. कन्स्ट्रक्शन हा कंत्राटदार बेंच प्रेस १७,७०० रुपये दराने २८ नग, डंबेल्स रॅक १४,१६० रुपये दराने २८ नग यांचा पुरवठा ९,२७,७६३ रुपयांत करणार आहे.

> मे. ग्रॅण्डस्लॅम फिटनेस प्रा. लि. हा कंत्राटदार डंबेल्स (२.५ कि. ग्रॅम) ३५० रुपये दराने ११२ नग, डंबेल्स (५.० कि. ग्रॅम) ७०० रुपये दराने ११२ नग, डंबेल्स (७.५ कि. ग्रॅम) १०५० रुपये दराने ११२ नग, डंबेल्स (१० कि. ग्रॅम) १४०० रुपये दराने ११२ नग, प्लेट (१० कि.ग्रॅम) १४०० रुपये दराने ११२ नग, प्लेट (७.५ कि.ग्रॅम) १०५० रुपये दराने ११२ नग, प्लेट (५.० कि.ग्रॅम) ७०० रुपये दराने ११२ नग यांचा पुरवठा ७,७४,५९२ रुपयांत करणार आहे.