मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची संपत्ती जप्त होणार

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचा जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका गुप्त बैठकीमध्ये हाफिज सईदची सर्व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानची आर्थिक मदत बंद करणार – डोनाल्ड ट्रम्प

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये सरकारकडून तीन अधिकारी उपस्थित होते. यावेळी जमात-उद-दावाचा मोरक्या हाफिज सईदची संपत्ती करण्याच्या निर्णयावर सर्व अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनच्या प्रवक्त्यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. पाकिस्तान सरकारकडून अधिकृतपणे घोषणा होत नाही, तोपर्यंत असं काही होणारच नाही, असे प्रवक्यांनी म्हटले आहे.