हेअर डिझायनिंग

हेअर डिझायनिंग ही आज करीयरची एक प्रतिष्ठत वाट आहे.

वेगवेगळ्या पद्धतीने केसांची रचना करण्याची ज्यांना आवड आहे, असे विद्यार्थी हेअर डिझायनर ही कला करीयर म्हणून निवडू शकतात. पूर्वी ठरावीक लोकच हा व्यवसाय करायचे, पण आता आवड असल्यास करीअर म्हणून कोणीही हेअर डिझायनिंग कोणीही करू शकतो. उत्तम प्रोफेशनल हेअर डिझायनरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनुभवाने हे शिक्षण प्राप्त होत असले तरी व्यावसायिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

हेअर डिझायनर म्हणजे फक्त फणी आणि कात्रीच्या सहाय्याने केस कापणे नाही, तर सेट करणे, रंगवणे, कंडिशन करणे इत्यादी कामेही हेअर डिझायनरला करावी लागतात. तसेच केसांचे प्रकार, त्यांची आवश्यकता, त्यावरील उपचार याकरिता लागणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचीही माहिती असण्याची आवश्यकता आहे. या व्यवसायात उत्तम कौशल्य असणाऱ्या हेअर डिझायनरला आंतरराष्ट्रीय ब्रँडकरिताही संधी आहे. याकरिता रचनात्मकता, कल्पकता आणि केसांचे प्रयोग करण्याचीही आवड असणे गरजेचे आहे. – तुषार चव्हाण, हेअर डिझायनर

वेतन – नवीन हेअर डिझायनरला असिस्टंट म्हणून काम करावं लागतं. ७ ते १० हजार रुपये प्रति महिना वेतन मिळते. आंतरराष्ट्रीय ब्रँण्डच्या पार्लरमध्ये १५ ते २० हजार रुपये वेतन असते. मान्यताप्राप्त, कौशल्य आणि अनुभवी हेअर डिझायनर महिन्याला ५० हजार रुपयेही कमवू शकतात.

शैक्षणिक सुरुवात – या क्षेत्रात करीअर करण्यासाठी १२वी पास होणे आवश्यक आहे. त्यानंतर जावेद हबीब, शहनाज हुसेन, भारती तनेजा, वंदना लुथेरा इत्यादी नामवंत संस्थांत या विषयात डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करता येतो. आयटीआयद्वारेही हा कोर्स शिकता येतो.

 • अभ्यासक्रम
 • सर्टिफिकेट कोर्स इन हेअर स्टायलिंग, २ महिने
 • सर्टिफिकेट कोर्स इन हेअर ट्रीटमेंट, १५ दिवस
 • सर्टिफिकेट कोर्स इन हेअर डिझायनिंग, २ महिने
 • डिप्लोमा कोर्स इन हेअर डिझायनिंग, ४ महिने
 • अॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन हेअर डिझायनिंग, २ महिने प्रशिक्षण संस्था
 • हबीब हेअर अकादमी, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद
 • नलिनी अँण्ड यास्मिन सलॉन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई
 • जूस हेअर अकादमी, मुंबई
 • शहनाज हुसेन इंटरनॅशनल ब्युटी अकादमी, दिल्ली
 • व्हीएलसीसी, दिल्ली
 • तुषार नॅशनल हेअर अकादमी, मुंबई