मोदी सरकार जाईपर्यंत कपडे घालणार नाही! येवल्याच्या कृष्णा डोंगरेचा निर्धार

सामना ऑनलाईन । निफाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक जिह्यातील निफाडमध्ये सभा पार पडली. या सभेदरम्यान येवला तालुक्यातील नगरसुल गावचा कृष्णा डोंगरे हा तरुण अर्धनग्न अवस्थेत शरद पकारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला. त्याने भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही तोपर्यंत आपण कपडे घालणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. त्याने जमिनीच्या प्रश्नाकरून काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते, परंतु सरकारने दडपशाही केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले आहेत. भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची अवस्था आणखीच बिकट झाल्याचे कृष्णा डोंगरे यांनी म्हटले आहे.