१९ वर्षापूर्वीही हनीचा हाच बाबा होता तिचा बनी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बलात्काराच्या आरोपात तुरुंगात गेलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम याची कथित मुलगी हनीप्रीत हीची १९ वर्षापूर्वीची डायरी एका वृत्तपत्राच्या हाती लागली आहे. हनीप्रीतप्रमाणेच तिची डायरीही गूढ रहस्यांनी भरलेली असून १९ वर्षापूर्वी पासूनच ती या बाबाची चाहती होती. त्याच्यासाठी तीने कविता व शायरीही लिहल्या होत्या. एवढच नव्हे तर बॉलिवूडचे तिला कायम आकर्षण होते. असेही या डायरीवरून स्पष्ट झाले आहे.

बलात्कारी बाबाची रवानगी तुरुंगात झाल्यापासून हनीप्रीत फरार आहे. ती कुठे आहे याचा शोध घेण्यात येत आहे. बाबा तिला आपली मुलगी मानत असल्याचे जगभराला ओरडून सांगत असला तरी या दोघांमध्ये वेगळेच संबंध असल्याचे समोर आले आहे. तिने ऐन तारूण्यात १९ वर्षापूर्वी लिहलेली डायरी एका हिंदी वृत्तपत्राच्या हाती लागली आहे. यात ती बॉलिवूड तारका काजोल हिची चाहती असल्याचं दिसत आहे. काजोलचे फोटो तीने या डायरीत ठेवले असून त्याखाली sweetu असं लिहलं आहे. दबंग सलमान, शाहरुख, व आमिर खान यांचेही फोटो तिच्या डायरीत सापडले आहेत. पण त्याचबरोबर एका पानावर बाबाचा फोटो व त्याच्यासाठी तिनं काही कविता व शायरीही लिहलेल्या आहेत. त्यात तिनं बाबावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यामुळे १९ वर्षापूर्वीही बाबा हाच तिचा हनी होता. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.