हनुमान जयंती उत्सवाचे कांदिवलीत आयोजन

4

सामना ऑनलाईन । मुंबई

कांदिवली पूर्वेकडील बाणडोंगरी विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार, 19 एप्रिल रोजी हा उत्सव येथे मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी हनुमान जन्मोत्सव, अभिषेक, दुपारी सत्यनारायणाची महापूजा आणि संध्याकाळी देवीचा मांड असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे सुबोध शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष स्मितोष कांदळगावकर, सागर सकपाळ, सचिव प्रमोद पाटील, उपसचिव दीपेश माईल, आकाश घाडी, खजिनदार विशाल पराडकर, उपखजिनदार अनु कोटीयन, प्रशांत सकपाळ, कार्याध्यक्ष संतोष वाईल, हिशोब तपासनीस अनिल घोले, अनिल तळेकर आणि संदीप दवटे, दीपक साळवी हे विशेष मेहनत घेत आहेत.