‘रेल रोको’ने हार्बर मार्ग सहा तास ठप्प

सामना प्रतिनिधी । मुंबई

भीमा-कोरेगाव विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचा मुंबईत मंगळवारी हार्बर सेवेलाही फटका बसला. सकाळच्या पिकअवरचा काळ सुरळीत गेल्यानंतर दुपारी पावणेबाराच्या सुमारास चेंबूर स्थानकात निदर्शकांनी घुसून अप मार्गावर ‘रेल रोको’केला. त्यानंतर पोलिसांनी हुसकावून लावलेले आंदोलक पुन्हा ट्रकवर आल्याने तब्बल सहा तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ८४ फेऱया रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना अतोनात हालाला सामोरे जावे लागले. या काळात मेन लाइन आणि ट्रान्स हार्बरची वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

राज्यात १८७ एसटी बसेसची तोडफोड

राज्यात पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर एसटी बसेस जनतेच्याच आहेत त्यांची तोडफोड करू नका, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे. दरम्यान, राज्यभरात १८७ एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यात संभाजीनगर २५, परभणी १७, नगर २८, जळगाव २१, सोलापूर ११ बुलढाणा व धुळे प्रत्येकी १०, जालना ७, बीड, लातूर, धाराशीव, पुणे, अकोला येथे प्रत्येकी सहा, सांगली ५, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव येथे प्रत्येकी चार अशा १८७ एसटी बसेसचे १ जानेवारीपासून झालेल्या हिंसाचारात नुकसान झाल्याची आकडेवारी महामंडळाने दिली आहे.

ट्रकवरून चालत घाटकोपर स्थानक गाठले

आंदोलनकर्त्यांनी स्थानकाच्या बाहेरील रस्ता वाहतूकदेखील बंद केली होती. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी, बसेसदेखील प्रकाशांसाठी उपलब्ध होत नव्हत्या. शेकटी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी चेंबूर स्थानकातील रेल्वे ट्रकचा ताबा सोडला आणि रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली. तोपर्यंत प्रकासी ताटकळत रेल्वे स्थानकामध्येच बसून होते. पावणेपाच वाजता वाहतूक जरी सुरु करण्यात आली असली तरी लोकल गाडय़ांच्या एकामागोमाग रांगा लागल्यामुळे वाहतुक अत्यंत धिम्या गतीने सुरु होती. टिळकनगर स्थानकातील प्रकाशांनी रिक्षाने विद्याविहार स्थानक गाठले, तर अनेकांनी चेंबूर स्थानकातून घाटकोपर स्थानकाच्या दिशेने चालत जाण्याचा निर्णय घेतला. या गोंधळाने हार्बरच्या ८४ फेऱया रद्द करण्यात आल्या, तर ५२ विशेष फेऱया चालविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी संपूर्ण चेंबूर रेल्वे स्थानकच ताब्यात घेतले. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांकरील रेल्के ट्रकमध्ये ठाण मांडले.
२) दुपारी दीड ते पावणेपाच वाजेपर्यंत हार्बर मार्गाकरील कुर्ला ते वाशीदरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चेंबूर भागात सकाळपासूनच तणावाचे वातावरण पसरले.
३) सायंकाळी पावणेपाचपर्यंत डाऊन मार्गावर दु. १.३६ वाजताची पनवेल तर अप मार्गावर दु. १.५२ वाजताची सीएसएमटी लोकल चेंबूर स्थानकातच रोखण्यात आली होती.
४) सायंकाळी पावणेपाच वाजता या दोन्ही लोकल मार्गस्थ करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांचा आवेश पाहून चेंबूर स्थानकातील तिन्ही तिकीट खिडक्या तत्काळ बंद करण्यात आल्या.
५) आंदोलकांनी रेल्वे ट्रकवर स्लीपर्स आडवे टाकून ट्रकवरच आपले बस्तान मांडले. दुपारी अडीचच्या सुमारास गोवंडी-चेंबूर स्थानकादरम्यान दोन लोकल गाडय़ा थांबविल्या.
६) चेंबूर स्थानकात चार लोकल खोळंबल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवासी लोकलमध्येच अडकून राहिले. तर अनेकांनी ट्रकवरून चालत जाण्याचा मार्ग अवलंबिला.