हार्दिक पटेल यांचे उपोषण 19 दिवसांनी मागे, ‘हे’ दिले कारण…

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आरक्षण व शेतकऱ्याना कर्जमाफी या मागणीसाठी गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या हार्दिक पटेल यांनी बुधवारी उपोषण मागे घेतले. 25 ऑगस्टपासून हार्दिक पटेल उपोषणावर बसले होते. बुधवारी पाटीदारांची प्रमुख संस्था खोड धाम आमि उमिया धामचे नेते उपोषण स्थळी पोहोचल्यानंतर हार्दिक पटेल यांनी उपोषण मागे घेतले. पाटीदार नेते सीके पटेल, नरेश पटेल, जेराम पटेर यांनी हार्दिक यांनी लिंबू पाणी आणि नारळ पाणी पाजून हार्दिक पटेल यांचे उपोषण तोडले.

यापूर्वी हार्दिक पटेल यांनी ट्वीट करून उपोषण मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते. पाटीदार समाजाच्या लोकांनी जिवंत राहून समाजासाठी लढा देण्याची विनंती केल्याने उपोषण तोडण्याचा निर्णय घेतला, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.

बुधवारी दुपारी केलेल्या ट्वीटमध्ये हार्दिक पटेल यांनी म्हटले की, शेतकरी आणि पाटीदार समाजाचे कुलदेवी श्री उमिया माताजी मंदीर ऊंझा आणि श्री खोडल माताजी मंदीर कागवडच्या प्रमुखांनी मला जिवंत राहून समाजासाठी लढा देण्याची विनंती केली. सर्वांच्या इच्छेचा मान ठेवत मी आज दुपारी तीन वाजता उपोषण मागे घेणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या