हार्दिक यांचे उपोषण मागे

सामना ऑनलाईन ।  अहमदाबाद

पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी येथील आपल्या निवासस्थानाजवळ गेल्या 19 दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण आज अखेर सोडले आहे. पटेल समाजाला ओबीसीअंतर्गत शिक्षण क्षेत्रात, सरकारी नोकऱ्यांत आरक्षण द्या आणि गुजराथी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या यासाठी आपले हे उपोषण होते.  कोणत्याही तोडग्याविना या उपोषणाची सांगता झाली आहे.