देश वाचवायचा की दंगल घडवणाऱ्यांना? शहांच्या फ्लूवर हार्दिकचे वादग्रस्त ट्वीट

47

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहांच्या आजारपणावर सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्यानंतर आता पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने वादग्रस्त ट्वीट केले आहे.

कर्नाटकच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा आजार, काँग्रेस नेत्याची बेताल टीका

देश वाचवायचा की दंगल घडवणाऱ्यांना? अशी चिंता डॉक्टरांना आहे. डॉक्टरांनी राष्ट्रधर्माचे पालन करावे, असे ट्वीट हार्दिक पटेल यांनी केले आहे. हार्दिकच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

याआधी शहांना डुकराचा हा आजार कर्नाटकच्या शापामुळे झाल्याचे बेताल काँग्रेस नेते बीके हरीप्रसाद यांनी केले आहे. या विधानानंतर टीका झाल्यानंतर हरीप्रसाद यांनी प्रतिक्रिया देताना मी केलेल्या विधानाबद्दल मला अजिबात खेद वाटत नाही म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या