हर्षदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे तिचा जोडीदार, तिचा अभिमान, तिचा सखा, चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ. नवऱ्यासाठी त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते. आता याच प्रिय व्यक्तीचं म्हणजेचं बायकोचं मनं जिंकण्यासाठी कलर्स मराठी नवऱ्यांसाठी एक अनोखं आव्हान घेऊन येत आहे.

पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या नवऱ्याला या खेळात भाग घ्यावा लागणार आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करणार आहे. ‘नवरा असावा तर असा’ हा कार्यक्रम १८ डिसेंबरपासून सायंकाळी ६.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर रसिकांना बघता येईल.