नवऱ्याला मारणाऱ्या गुंडांना बायकोने बदडले ! पहा व्हिडीओ

यमुना नगर । हरयाणा

गुंडांचा मार खात असणाऱ्या नवऱ्याचे बायकोने संरक्षण करण्याची घटना हरयणातील यमुना नगरमध्ये घडलीय. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. जमिनीवर पडलेल्या या व्यक्तीला काही जण बेदम मारहाण करत होते. आपल्या नवऱ्याला होणारी ही मारहाण पाहून ही महिला पुढे आली आणि तिने या सर्व गुंडांना काठीने बडवत पिटाळून लावले.

या मारहाणीमागील नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. तसेच मार खाणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी हा व्हीडीओ कोण शूट करत होतं असा सवालही आता सोशल माध्यमातून विचारला जात आहे.