उन्हाळ्यातील डोकेदुखी

अर्धशिशी म्हणजे एक प्रकारची डोकदुखीच… सर्दी, त्रास, जागरण यामुळे तिचा सामना करावा लागतो… यावर काही घरगुती उपायांनीही त्वरित आराम मिळतो.

– अर्धशिशीचा त्रास होत असेल तर ग्लासभर पाण्यात लिंबाचा रस व २ चमचे सेंद्रिय मीठ घालून प्या. अर्धशिशी लगेचच थांबेल.
– डोके दुखत असल्यास किंवा अर्धशिशीचा त्रास होत असल्यास केळ्याची साल कपाळावर ठेवा.
– ६ कप पाण्यात लव्हेंडर ऑइलचे ८ थेंब टाका. हे पाणी उकळून त्याची वाफ घ्या आणि त्या पाण्याने कपाळावर मसाज करा.
–  सुंठ पावडर पाण्यात भिजवून कपाळावर लावल्याने अर्धशिशी बरी होते.