५ काजू रोज

रोज पाच काजू खा आणि फरक अनुभवा.

  • काजूमधील ऍण्टीबॅक्टेरियल आणि ऍण्टी फंगल गुणधर्मामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो.
  • काजूमध्ये कॉपर अधिक असते. त्याचा फायदा केसगळती थांबवण्यासाठी होतो.
  • काजू खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • काजूमधील फॉस्फोरसमुळे दात मजबूत व्हायला मदत होते.
  • काजूमध्ये फायबर मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे आहारात काजू असतील तर पचन सुरळीत होते आणि वजन कमी होते.
  • काजूत कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका जातो.
  • स्नायू बळकट करायचे असतील तर त्यातील प्रथिनांमुळे काजू चांगले.
  • काजूमधील फॉलिक ऑसिडमुळे बुद्धी तल्लख होते.
  • कर्करोग टाळायचा तर काजू बेस्ट. कारण काजूमध्ये ऍण्टीऑक्सिडेंट्स खूप असतात.