बहुगुणी लसूण

गोड, खारट, तुरट, कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसूण…याचे वैशिष्टय़ असे की, खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा एकमेव कंद आहे...पाहूया लसणाचे औषधी उपयोग.

> दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांसह आयोडिन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी अनेक पोषक तत्त्वं एकत्र मिळतात.

> दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

> भाताने पोट फुगत असल्यास लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा.

> हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो.

> ज्वरनाशक असून हाडांतला तापही त्यामुळे बरा होतो.

> लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यिस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.

> ज्या मुलांना कफ-सर्दीचा त्रास जास्त होतो त्यांना लसणाच्या पाकळ्यांची / कांडय़ाची माळा घालावी. त्रास कमी होतो.

> लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगाचं तेल आणि शहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.

> लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणाऱया संसर्गापासूनही बचाव होतो. अस्थम्यासारख्या श्वसनविकारात लसूण गुणकारी आहे.

> थंडी किंवा बदलणाऱया वातावरणात सर्वच वयोगटांतील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.