रोज बदाम खा

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. त्यात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा थ्री फॅटी ऑसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. केवळ बदाम खाण्यापेक्षा ते रात्रभर भिजवून सकाळी सोलून खाल्ले तर त्याचे फार आरोग्यदायी फायदे आहेत. भिजलेले बदाम पचनासाठी सोपे असते.

रक्तदाब नियंत्रणात

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. बदाम खाल्ल्याने रक्तात ‘अल्फा टेकोफेरॉल्स’चे प्रमाण वाढते जे  रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास त्यामुळे नैसर्गिकरीत्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.

मधुमेहासाठी

रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने ज्यांना मधुमेह असतो त्यांचा थकवा दूर होतो. अन्न झाल्यानंतर बदाम खाल्ल्याने शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यापासून रोखते. ज्यामुळे मधुमेह  होण्यापासून बचाव होतो.

लठ्ठपणा कमी करते

बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणाऱया भुकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

हृदयाच्या स्वास्थ्यासाठी

बदामातील ऑन्टिऑक्सिडंट घटक शरीरातील कॉलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो.

चिरतरुण दिसता

नियमित भिजलेले बदाम खाल्ल्याने त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत. यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असल्याने चिरतरुण दिसता.

तल्लख बुद्धी

दररोज चार ते पाच बदाम मुलांनी खायला हवे. बुद्धीला चालना मिळते, रोगप्रतिकारक क्षमता पण वाढते. ज्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

पचनशक्ती सुधारते

बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्झाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत करतात. परिणामी पचनशक्ती सुधारते.