सायकल चालवा आणि फिट राहा

सामना ऑनलाईन । मुंबई

सायकल चालवणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. सायकल चालवल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य टिकून राहते.

सायकल चालवण्याचे फायदे

१) नियमित सायकलिंग केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते. हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो

२) सायकलिंगमुळे हृदय तंदुरुस्त राहते

३) नियमित सायकल चालवल्यास शरीराचे स्नायू बळकट होतात. तसेच पायांची कार्यक्षमताही वाढते.

४) सायकल चालवल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

५) उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित सायकल चालवण्याचा व्यायाम करावा.

६) सायकल चालवल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरेसा प्रवाह राहतो.

७) सकाळी सायकल चालवल्याने रात्री चांगली झोप लागते.

८) शरीरात ब्रेनसेल्स वाढवण्याचे काम सायकलिंगमुळे होते.

९) सायकलिंग केल्याने वजन आटोक्यात ठेवणे शक्य होते.