आरोग्यदायी सूचना

> केसात कोंडा असल्यास आंबट दही किंवा ताकात मुलतानी माती मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा. त्यानंतर केस धुवा.

> स्थूलपणा कमी करण्यासाठी रोज गरम पाणी प्या. गरम पाण्यात गोमूत्राचा अर्क घालून प्यायल्याने महिन्याभरात २ किलो वजन घटू शकते.

> दररोज एक ग्लास ताकात लवणभास्कर किंवा हिंग्वाष्टक चूर्ण घालून प्या. अपचनाची समस्या दूर होईल.

> ५० ग्रॅम त्रिकटू चूर्ण, १० ग्रॅम प्रवाळ पिष्टी किंवा गोदंती भस्म एकत्र करून ठेवा. आर्धा ग्रॅम मधासोबत सकाळ-संध्याकाळ घ्या. थायरॉइडचा त्रास दूर व्हायला मदत होईल.

> टायफॉइड झाल्यास ८-१० मनुका, ४-५ अंजीर आणि १-२ ग्रॅम खुबकळा (मोहरीच्या दाण्यांसारख्या) वाटून त्याची चटणी सकाळ-संध्याकाळ खा.

> मधुमेह कमी करण्यासाठी रात्री २५ ते ३० मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी प्या आणि भिजलेले मेथीचे दाणे चावून खा.