ही औषधं घरी असायला हवीत!

ओआरएस

अतिसार आणि डायरियासाठी ओरल रिहायड्रेशन साल्टचा उपयोग केला जातो. पाण्यात मिसळून ते प्यायल्याने ताकद मिळते.

आयबुप्रोफेन

ही पेनकिलर गोळी आहे. याबरोबर पॅरेसिटेमॉल आणि डायक्लोफिनेक पण घेऊ शकतो. पण या गोळ्या काही खाल्ल्यानंतरच घ्याव्यात.

सेट्रिझिन, लोराटॅडिन

ऍलर्जीला प्रतिबंध करणारे औषध आहे. सर्दी, ताप, ऍलर्जी, खाज येत असेल किंवा किडा चावला असेल तर हे औषध घेऊ शकता, पण या गोळय़ा घेतल्यावर झोप येते. त्यामुळे झोपण्यापूर्वी या गोळय़ा घ्याव्यात.

ऑण्टिसेप्टिक

या औषधांचा वापर कापले असेल, जळले असेल, एखादी जखम झाली असेल, खरचटले असेल तर करता येतो. याचे क्रीम, लोशन किंवा पावडर असते.

 नोझल स्लाईन ड्रॉप

लहान मुलांचे नाक चोंदल्यावर हा खूप महत्त्वाचा आहे. याचा एक-एक थेंब नाकात घातल्यावर नाक मोकळे होते.

हायड्रोजन पेरॉक्साईड

हे विविध कामांसाठी उपयोगी पडते. जखम साफ करण्यासाठी, दातांना चमकदार बनवण्यासाठी, कानातील मळ साफ करण्यासाठी. पाण्यात घालून आंघोळ करण्यासाठी याचा उपयोग होतो.

ऍण्टासिड टॅब्लेट

छातीत जळजळणे, अपचनासाठी या गोळीचा वापर होतो. ही गोळी सकाळी खाली पोटावर घ्यायची. तत्काळ आराम मिळण्यासाठी सिरप किंवा जेलचा वापर करता येतो.