बहुगुणी कोथिंबीर

>केस गळण्यावर सोपा पण अतिशय प्रभावी उपाय म्हणजे कोथिंबीर… कोथिंबिरीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.  कपभर कोथिंबीर वाटून घ्यायची. त्यात मेथीचे दाणे आणि नारळाचे दूध घालून पेस्ट बनवा. टाळूला आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवायचे. केसगळती थांबून केस चमकदार होतील.

>मुलींना मोठी समस्या वाटते ती ऍक्नेची. पण त्यावर लोशन किंवा ऑईन्मेंट्स लावण्यापेक्षा कोथिंबिरीची पेस्ट उत्तम… कोथिंबिरीची पाने, देठे यांची पेस्ट बनवून ती चेहऱयाला लावायची. फक्त ऍक्नेवरही शकता. 15 मिनिटे पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवायचा.

>अन्न नीट पचले पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पचनक्रिया सुरळीत करण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे कोथिंबीर खाणे. तसंच कोथिंबीरीचे पाणीही पिता येईल. पाण्यात थोडी कोथिंबीर, लिंबाचे काही काप घाला आणि प्या.

>कोथिंबिरीत असलेल्या के व्हिटॅमिनमुळे बोन मास वाढण्यास मदत होते. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.

>कोथिंबिरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयन, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हार्ट रेट नियंत्रित असण्यास मदत होते. रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार नियंत्रित राहतात.