हेल्थ टीप्स सुका मेवा

– काळ्या मनुका खाल्ल्याने पित्त कमी होते. पचनशक्ती सुधारून पोट साफ राहते. वजन कमी होते. आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. केसगळती कमी व्हायला मदत होते. यामधील अँण्टीऑक्सिडंटमुळे शरीराची कार्यशक्ती वाढते.

– रोज रात्री एक बदाम भिजवून ठेवून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. केस वाढतात. रक्तदाब कमी होतो. हाडे बळकट होऊन कोलेस्ट्रॉल वाढतं. हिमोग्लोबीन वाढतं. त्वचेचा पोत सुधारतो. उत्साह वाढतो.
– खारीक चवीला गोड आणि थंड असते. रोज सकाळी एक खारीक खाल्ल्याने भूक वाढते, रक्तदोष दूर होतो. हाडं मजबूत होतात. दात बळकट होतात. केसगळतीही थांबते.
– सुके अंजीर आतडय़ांच्या विकारात गुणकारी आहे. रक्तशुद्धी, पचनशक्ती वाढवणे, रक्तवर्धक, हार्मोन्स चांगले करते, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, कार्यक्षमता वाढवणे यांसाठी सुके अंजिर खाणे उपयुक्त आहे. यामुळे त्वचा सुधारते, पोट साफ राहते. मुलींनी हे अवश्य खावे.
– जांभूळ पोटातील कृमींचा नाश करते. लघवी साफ होते. हे फळ वात-पित्तनाशक असून यामुळे दमा कमी होतो. उन्हाळ्यात जांभूळ खाणे बहुगुणी मानले जाते. जांभळामुळे रक्त शुद्ध होते. जुलाब होत असल्यास जांभूळ खावेत.