टीप्स : फिट राहा

1

> व्यायाम हा दिवसातून किमान एक तास करणे आवश्यक असते. त्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.

> दिवसातून पाच वेळा दोन ग्लास पाणी प्या. त्याने पचनक्रिया चांगली होते आणि पोट साफ राहते.

> जंक फूड खाणे शक्यतो टाळा. जंक फूडमध्ये असलेल्या अतिरिक्त कॅलरिजमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी यासारख्या दुर्धर आजार जडतात.

> रात्रीची किमान आठ तास झोप घेणे आवश्यक असते. कारण रोज आठ तासांची झोप निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.

> कायम लिफ्टचा वापर करण्यापेक्षा दिवसातून एकदा जिने चढून गेल्यावर अधिक प्रमाणात हालचाल होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

> दिवसभरात केवळ दहा मिनिटे खळखळून हसलात तर स्मरणशक्ती वाढतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे मनसोक्त हसा, आळस निघून जाईल.