जीम आणि डाएट न करताही वजन करा कमी

सामना ऑनलाईन। मुंबई

वजन आटोक्यात ठेवायचं असेल फिट राहायच असेल तर जीम आणि डाएट करावंच लागतं. असे बोलले जाते. पण तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही काही टीप्स न चुकता अंमलात आणल्या तर जीमला न जाता डाएट न करताही तुमचे वजन कमी होऊ शकते.

milk-1

दूध पिणे…दूधात कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्याने डॉक्टर आपल्याला नेहमी दूध पिण्याचा सल्ला देतात. दूध पिल्यामुळे हाडं मजबूत होतात. हे जरी खरे असले तरी वजन कमी करण्यासाठीही दूध तितकच महत्वाचे आहे. हे फारसं कुणाला माहित नाही. दूध पिल्यामुळे पचन शक्ती वाढते. गायीच्या दूधात एक विशिष्ट प्रकारचे अॅसिड असते. जे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वेगात वितळवण्याचं काम करतं. यामूळे दूध आवडत नसलं तरी रोज एक कप, एक ग्लास दूध प्या आणि फिट राहा.

laughing

हसत राहा… सतत खाण्यामुळे जसं वजन वाढत. तसंच टेन्शन घेतल्यानेही वजन वाढतं. यामुळे चिंता करू नका. चिंता केल्याने प्रश्न तर सुटत नाहीच. उलट उच्च रक्तदाब, मधुमेह जडतो. यामुळे त्रासात वाढच होते. हे टाळण्यासाठी सतत हसत राहा. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद घ्या. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. रक्ताभिसरण प्रक्रीया सुधरेल. पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळेल. वजनही आटोक्यात राहील.

green-tea

ग्रीन टी प्या…ग्रीन टीमुळे पचनशक्ती सुधरते. ग्रीन टी नियमित प्यायल्याने सात दिवसात ४०० कॅलरी बर्न होतात. एवढेच नाही तर यातील अँटी ऑक्साईडही शरीराला फायदेशीर ठरतात.

breakfast

नाश्ता कराच...सकाळचा नाश्ता कधीही चूकवू नका. कारण सकाळचा नाश्त्यातून दिवसभराची तुम्हांला दिवसभराची उर्जा मिळते. यामुळे चयापचय क्रिया सुधारते. वजन वाढत नाही.

dinner

रात्रीचे जेवण वेळेवर करा…रात्रीचे जेवण शक्यतो ८ च्या आधी घेतलेले बरे. यामुळे अन्नपचन नीट होते. जेवण झाल्यानंतर दात घासावे. ग्रीन टीचे सेवन करावे. पुन्हा भूक लागत नाही.

water-drinking

पाणी जास्त प्यावे…दिवसाला कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे अन्नपचन लवकर होते. जेवताना जास्त पाणी पिऊ नये. मात्र जेवण झाल्यावर १५ मिनिटांनी पाणी प्यावे.

salad

आहारात फळे व सॅलेडचा समावेश करावा… घरबसल्या वजन कमी करायचे असेल तर फळे खाणं गरजेचे आहे. शक्यतो जेवणाच्या आधीच फळं किंवा सॅलेड खावे. यामुळे शरीरात उर्जा निर्माण होईल व चयापचय क्रिया सुधरेल.