Healthy दिनचर्या

> सकाळी उठल्यावर नियमित एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनशक्ती सुधारेल. हृदयाचे विकार होण्याचा धोका कमी होईल.

> सकाळची न्याहारी ही सकाळी सात ते नऊ या वेळेत करावी. त्यामुळे मेंदू कार्यरत राहील आणि ताजेतवाने वाटेल.

> नेहमी वेळेवर जेवावे. जेकणामध्ये एकाकेळी एका पद्धतीचेच खावे.

> जेवल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास पाणी पिऊ नये. नंतर पाणी प्यावे. पचनक्रिया व्यवस्थित होते.

> जेवल्यावर लगेच कुठलेही मेहनतीचे काम करू नये.

> रोज किमान अर्धा तास कोवळे उन अंगावर घ्यावे. त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळेल.

> बसताना ताठ बसावे. त्याने पाठ दुखण्याचा त्रास होत नाही.

> रोज सात ते आठ तास झोपावे. बेडरूममध्ये हवा खेळती ठेवावी.