मानसिक तणावावर फळे खा.

पपई – हे फळ antioxident चा उत्तम स्त्रोत आहे. भरपूर क जीवनसत्व यात असते. पपईच्या सेवनाने अतिरिक्त वजन कमी होते. कर्करोगापासून बचाव होतो. क जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

किवी – हे फळ त्याच्या रंगामुळे, तुरट, गोड चवीमुळे मानसिक ताणावर उत्तम ठरते. यात लोह आणि फॉलिक एसीड भरपूर प्रमाणात असते. शिवाय क जीवनसत्वही भरपूर प्रमाणात असते.

स्ट्रोबेरी – लालचुटुक स्ट्रोबेरीमुळे हृदयाचे आरोग्य जपले जाते. कर्करोग टाळता येतो. क जीवनसत्वाबरोबर यात माग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हिच्या सेवनामुळे दिवसभर ताजेतवाने राहता येते.

पेरू – हे जगातील सर्वात जास्त क जीवनसत्व असलेले फळ आहे. या एका फळात ३७६ मिलीग्राम क जीवनसत्व असते. जे आपल्या शरीराला एक आठवडा पुरते. शिवाय पेरूच्या नियमित सेवनाने वजन कमी होणे, बद्धकोष्ठता आणि अतिसारापासून आराम मिळतो. रक्तातील colesterol कमी होते.

केळी – केळ्याच्या गोडव्याने मनावरील ताण कमी होतो. शक्ती मिळते. ताण तणाव जाणवत असेल तर केळ्याच्या सालीचा चहा करून प्यावा.

ध्यानधारणा- नियमित ध्यानधारणा निरोगी शरीरासाठी आणि मनासाठी खूपच फायदेशीर आहे. ध्यान हे एक जुने योग तंत्र आहे. यामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधला जातो. ध्यानधारणेतून मन:शांती मिळते. मेंदूत आनंदी स्त्राव तयार होतात.

योग- दररोज ३० ते ४० मिनिटे योगाभ्यास करून मानसिक ताण तणाव दूर केला जाऊ शकतो. शिवाय शरीरयष्टी डौलदार होते.

जलद चालणे- ३० मिनिटे जलद चालण्याने शरीराला आणि मनाला खूप फायदा होतो. मोकळ्या हवेत अवश्य चालायला जावे.