पाहा आरोग्यदायी लसणाचे फायदे

अन्नाची चव वाढवणारे लसूण… आरोग्यदायी, तारुण्य प्रदान करणारे आहे… अन्नाचा स्वाद वाढवण्याबरोबरच औषध म्हणूनही ते वापरता येते.

– लसूण प्रभावी जंतुनाशक आहे. लसणात ऑलिसिन नावाचं रसायन असतं. ते ऑन्टिबायोटिकचेही काम करते.

– लसणामुळे कोलेस्टेरॉल कमी होतो त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रक्षण होते. त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका टळतो. लसूण ह्रदयरोग प्रतिबंधक आहे.

– रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलचा थर काढून टाकणे आणि रक्त पातळ करण्यास लसणाची मदत होते. लसणात सल्फर असते, ते कॅन्सरवर प्रभावी औषध आहे. यामुळे शरीरातील पेशींना कॅन्सरशी लढण्यास चालना मिळून रेगप्रतिकारक शक्ती वाढते.

– लसूण खाल्ल्याने नवीन पेशी तयार होतात. यामुळेच शरीराला नवतारुण्य प्राप्त होते. सहनशक्ती वाढते. रोज जेवतांना एक लसणीची पाकळी खाल्ली तर त्यांचा शरीरावर उत्तम परिणाम होतो.