व्हिडीओ-पराभवामुळे ट्रम्प यांचा थयथयाट, पत्रकाराला उद्धट म्हणत प्रेस पास रद्द केला

1

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या सिनेटसाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त हादरा बसला आहे. अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रॅटिक पक्षाने नियंत्रण मिळवले असून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला सिनेटमधील बहुमत कायम राखण्यात यश मिळालं आहे.  प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटसना बहुमत मिळाल्यामुळे  ट्रम्प यांच्या कारभारावर त्यांना वचक ठेवता येणं शक्य होणार आहे. यामुळे ट्रम्प हे भयंकर संतापले असून त्यांनी सगळा राग पत्रकारांवर काढला.

सीएनएनचे पत्रकार जॉन अकोस्टा यांनी ट्रम्प यांना मध्य अमेरिकेतून येणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारला होता. ट्रम्प यांनी मध्य अमेरिकेतील प्रवाशांना सातत्याने गुन्हेगार असं लेबल लावून त्यांची थट्टा उडवली आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना ट्रम्प भडकले आणि त्यांनी उत्तर दिलं की देश कसा चालवायचं ते मी बघतो तुम्ही सीएनएन कसं चालवायचं ते बघा. यानंतर ट्रम्प यांनी या पत्रकाराच्या हातून माईक काढून घ्यायला सांगितलं. इतकंच नाही तर व्हाईट हाऊसमध्ये येण्यासाठी आश्यक प्रेस पास रद्द करण्याचेही आदेश देऊन टाकले. जवळपास दीड तास चाललेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी ट्रम्प यांनी पत्रकारांवर अरेरावी केली किंवा अश्वेतवर्णीय, अमेरिकेबाहेरून येणाऱ्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली.

2 प्रतिक्रिया

  1. Who is reporting this garbage? Trump didn’t lose. He outperformed expectations! There was no blue wave. Democrats lost seats in the Senate and won far fewer seats in the House than what the idiotic pollsters and biased election experts predicted. Stop such stupid reporting. We support Shiv Sena, but Saamna should stick to reporting on Maharashtra and India politics and not take sides when it comes to US politics without fully understanding what you are talking about.