गणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त; 5 हजार सीसीटीव्हीतून वॉच

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

गणेशोत्सव सोहळा उत्साहात भक्तिभावात आणि कुठल्याही विघ्नाविना शांततेत पार पाडण्यासाठी मुंबईमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. 50 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा 24 तास प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार असून संपूर्ण शहरावर 5000 सीसीटीव्हीतून वॉच राहणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम दोन्ही एकाच वेळी आले आहेत. त्यामुळे मोहरम आणि गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. संपूर्ण शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय सशस्त्र्ा दल,  एसआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी.एस, मुंबई वाहतूक पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी, एटीएस, फोर्स वन, क्यूआरटीचे जवान व आरएएफची एक कंपनी तैनात असणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात राहणार आहेत.