ठाण्यात मुसळधार पावसाने घेतले चार बळी

1
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । ठाणे

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी सकाळी जोर पकडला. ठाण्यामध्ये सोमवारी सकाळी सुरू झालेल्या पाऊस सायंकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात कोसळत होता. या कोसळधारेमुळे ठाण्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ मध्ये भिंत कोसळून तरूण ठार झाला तर कळव्यात रेल्वेने खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे वसईमध्ये खड्ड्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवताना टेम्पोचालकाचा आपला जीव गमववा लागला तर भिवंडीत नाल्यात चिमुकला वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला.