विदर्भ, मराठवाडय़ात मुसळधार, पश्चिम महाराष्ट्रात संततधार

पाण्यात मस्ती

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून राज्यात १ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ७५७.७ मि.मी. म्हणजेच एवूâण सरासरीच्या ९१.१ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये ५९.१७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून खरीप हंगामात ९४ टक्व् क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दमदार पाऊस होत असल्याने संपूर्ण राज्यच आता चिंब झाले आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूरसह १५ धरणे भरली आहेत. गोदावरीस पूर आला आहे. तर तीन धरणे भरल्याने पुणेकरांची पाण्याची टंचाई दूर झाली आहे. विदर्भात नागपूर, गोंदिया, गडचिरोलीसह ११ जिल्ह्यांत मान्सून सक्रिय झाला असून पश्चिम महाराष्ट्रात संततधार सुरू आहे.

मुंबईसह कोकण, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दमदार पाऊस होत असल्याने संपूर्ण राज्यच आता चिंब झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, नंदुरबार, धुळय़ात जवळजवळ अडीच महिन्यांपासून दडून बसलेला पाऊस परतल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक जिह्यात गंगापूरसह 15 धरणे, पुण्यास पाणीपुरवठा करणारी तीन धरणे भरली आहेत. विदर्भ, प. महाराष्ट्रात संततधार पाऊस झाल्याने राज्यात जवळजवळ सर्वच विभागांतील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
सध्या बंगालचा उपसागर क अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली असून, राज्यात चक्राकार कारे काहत आहेत. यामुळे बाष्पाच्या प्रमाणात लक्षणीय काढ झाली असून, यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नगर जिह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने  नगर जिह्याला झोडपून काढले आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याशिवाय निळवंडे धरण, ओझर, बंधारा भरला आहे. मुळा धरण 70 टक्के भरले आहे. कोल्हापूर जिह्यात राधानगरी धरणाचे कालपासून उघडे असलेले दोन स्वयंचलित दरवाजे आजही उघडेच राहिले.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; धरणे ओव्हरफ्लो
पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी दमदार पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पाणशेत, वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून 18 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत आहे. दुसरीकडे पुणे जिल्हय़ातील मुळशी, पवना, आंद्रा, वडिवळे, भान आसखेड चासकमान, कळमोडी, नीरा देवधर, भाटघर, वीर ही दहा धरणे शंभर टक्के भरली आहेत.

राज्यात सरासरीच्या 91 टक्के पाऊस; जलाशयांमध्ये 51.17 टक्के पाणीसाठा

राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून राज्यात 1 जून ते 21 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 757.7 मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या 91.1 टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये 59.17 टक्के साठा निर्माण झाला असून खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्राकर पेरणी पूर्ण झाली आहे.

राज्यातील विविध जिह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार 14 जिह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नगर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, काशीम, नागपूर आणि गडचिरोली या जिह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 18 जिह्यांमध्ये 75 ते 100 टक्के यादरम्यान पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिह्यांचा समावेश आहे. तसेच 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झालेल्या जिह्यांमध्ये नंदुरबार आणि सोलापूर या जिह्यांचा समावेश आहे.

मुंबईकरांना खूशखबर…भातसा ओव्हरफ्लो

गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज भातसा धरण ओव्हरफ्लो वाहू लागले. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून 68.67 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’ राहणार आहे. तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर ही धरणे यापूर्वीच ओसंडून वाहू लागली आहेत. दरम्यान, भातसा नदीच्या दोन्ही तीरांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा धरणाची उंची 142 मीटर असून यामध्ये पाण्याचा एकूण साठा 884.522 दशलक्ष घनमीटर आहे.