पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यासह संततधार

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रविवारपासून संततधार पावसाने झोडपले आहे. वादळी वारे आणि दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. पुढील ४८ तासांत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
पुढील ४८ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच दि. २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळवले आहे.