स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या कर्मभूमीत “हे मृत्युंजय”

4

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीने प्रज्वलीत विचारांची शिदोरी नव्या पिढीला ज्ञात व्हावी, नव्या पिढीला स्वातंत्र्याचे मूल्य कळावे या उद्देशाने हे मृत्युंजय या नाटकाचा प्रयोग गुरुवार 16 मे रोजी सायकांळी सात वाजता स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात सादर होणार आहे. हा नाट्यप्रयोग सर्व नागरीकांसाठी मोफत असल्याची माहिती अ‍ॅड.बाबा परुळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दिग्पाल लांजेकर यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या हे मृत्युंजय या नाटकांचे राज्यभर प्रयोग होत आहेत. 16 मे रोजी रत्नागिरीत हा प्रयोग होणार आहे़ विेषेश करून शालेय विद्यार्थ्यांनी हा प्रयोग पहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. कारण नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची राष्ट्रभक्ती, त्यांनी केलेल्या त्याग, त्यांनी भोगलेली जन्मठेप याचा इतिहास कळावा हा उद्देश आहे असे अ‍ॅड.परुळेकर यांनी सांगितले.

अंदमानात बंदिवान असताना सावरकंरांनी भोगलेल्या यातना त्यांच्यासोबत त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकरही तुरुंगात होते. अंदमान येथील जेलर डेव्हीड बॅरी यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा अतोनात छळ केला, मानसिक त्रास दिला. या सर्व छळाला पुरुन उरुन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी मृत्यूलाही आव्हान दिले आणि ते मृत्यूंजय बनले. या अद्वितीय संघर्षाची कहाणी हे मृत्युंजय मधून रसिकांच्या समोर येणार आहे. या नाटकात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची भूमिका अजिंक्य ननावरे यांनी केली आहे. त्याचबरोबर शार्दूल आपटे, बिपीन सुर्वे हे दूरचित्रवाणीवर चमकलेले कलाकार या नाटकात काम करत आहेत अशी माहिती अ‍ॅड.परूळेकर यांनी दिली. यावेळी आनंद मराठे, एस.बी.खेडेकर, कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकूरदेसाई उपस्थित होते.